नवी दिल्ली / लखनौ : हाथरस येथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी वेगवेगळे राजकीय पक्ष घटनास्थळी पोहचले आहे. आज हाथरसमधील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आरएलडी आणि सपाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक करून पोलिसांचा सुरक्षा घेराव तोडला. यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. यावेळी आरएलडी कार्यकर्ते ग्रामस्थांशी भिडताना दिसले.
आज रविवारी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सूचनेवरून समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. यासह आरएलडी पक्षाचे कार्यकर्ते आणि सपा कार्यकर्त्यांनी गावात गोंधळ घातला. माहितीनुसार, हाथरसमधील आरएलडी कार्यकर्त्यांनी सुरक्षा घेरा तोडून पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्यात जोरदार दगडफेक सुरू झाली आहे.
परिस्थिती बिघडण्यापूर्वी राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की त्यांचे कार्यकर्ते केवळ पीडित कुटुंबाचं दुःख जाणण्यासाठी आले आहेत. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. तो मर्यादित कार्यकर्त्यांसोबत आले आहेत. राज्यात अशी घटना घडल्यानंतर पीडितांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाठीचार्ज आणि दगडफेकीनंतर सांगितले की ते देश वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी आले आहेत. आमच्या बहिणी आणि मुलींवर अन्याय होत असेल तर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करण्यात काय चूक आहे. परंतु, पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. महिलांनाही त्यांना सोडले नाही. त्यांच्यावरही लाठ्या चालवण्यात आल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हाथरसमधील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी आरएलडी आणि सपाचे कार्यकर्ते आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी दगडफेक करून पोलिसांचा सुरक्षा घेराव तोडला. यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. यावेळी आरएलडी कार्यकर्ते ग्रामस्थांशी भिडताना दिसले. ज्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्यात जोरदार दगडफेक सुरू झाली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षातील केवळ 5 लोकांना भेटण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर कलम 144 नुसार जमावासह आलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांना रोखण्यात आले.
* सीबीआय चौकशीची मागणी मान्य
या प्रकरणात, पीडितेच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. तत्पूर्वी, यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
* सर्वणांमधील विविध समाजाच्या प्रतिनिधींची बैठक
सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. याच गावात रविवारी सवर्णांची एक बैठक घेण्यात आली. हाथरस घटनेत अटक झालेल्या आरोपींच्या समर्थनार्थ आज सर्वणांची ही बैठक झाली. यावेळी एका आरोपीचे कुटुंबीयही या बैठकीला हजर होते. भाजप नेते राजवीरसिंह पहलवान यांच्या घरी ही बैठक झाली. हाथरस येथे दलित तरुणीवर कथित सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या मृत्यूबद्दल देशभर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
सर्वणांमधील विविध समाजाच्या प्रतिनिधींची बैठक भाजप नेत्याच्या घरी झाली आहे. हा एक स्वागत समारंभ होता. सीबीआयच्या चौकशीचे स्वागत करण्यासाठी नागरिक इथं आलं होते. कोणालाही बोलावलेलं नाही. आरोपी लवकुशची आईसुद्धा इथे आली होती, अशी माहिती आहे. अशी कुठलीही बैठक घेऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. तरीही ही बैठक झाली.