Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून ‘आक्रोश’ करणार समाज ‘बेटी’ वर बलात्कार होऊनही ‘शांत’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून ‘आक्रोश’ करणार समाज ‘बेटी’ वर बलात्कार होऊनही ‘शांत’

Surajya Digital
Last updated: 2020/10/04 at 11:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरुन योगी सरकार, मोदी सरकार आणि भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. एका नटीची भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका बेटीवर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी १९ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाला. नंतर तिच्यावर हल्ला करण्यात आला. उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी बचाव बचाव असा आक्रोश करत तडफडून मेली. यावेळी तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच काय हा अन्याय? असे बोंबलणारा मीडियादेखील कंठशोष करताना दिसला नाही.. का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

* महिला आयोग हाथरस प्रकरणात शांत

कंगना रणौतने जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्यं केलं तेव्हा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले होते की यापुढे तिने अशी वक्तव्यं केली तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कंगनाचे थोबाड फोडतील. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा मुद्दा समोर आणला होता. तोच महिला आयोग आज हाथरस प्रकरणात शांत बसला आहे. हाथरच्या बालात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहचू शकला नाही हा प्रकारच धक्कादायक आहे.

* एवढे भय आणि अमानुषता कशासाठी?

२९ सप्टेंबरला हाथरस येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला तेव्हा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरु झाले होते. दिल्लीपासून २०० किमी अंतरावर असलेल्या हाथरसमध्ये पोलिसांनी चुपचाप पीडित मुलीची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. अँब्युलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच मुलीच्या आईने स्वतःला अँब्युलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले. हे एवढे भय आणि अमानुषता कशासाठी? हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृती यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

* राष्ट्रपती राजवटीची मागणी होताना दिसून येत नाही

काँग्रेस नेते राहुल आणि प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना फक्त अडवले नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले. महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत आले होते. त्यांनी रामजन्मभूमिची पूजा केली. त्यावेळी श्रीरामासोबत सीतामाईचा वावर तिथे होता. त्याच भूमिवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सगळे त्याच उत्तर प्रदेशात घडले जिथे भाजपाचे सरकार आहे. अशा प्रकारची घटना महाराष्ट्रात घडली असती तर सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती राजवटीची मागणी झाली असती. उत्तरप्रदेशबाबत अशी मागणी होताना दिसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #नटीची #भिंत #पाडली #आक्रोश #हाथरस #प्रकरणावर #समाज #शांत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुवर्णपदक विजेत्या शूटर श्रेयसी सिंहने केला भाजपमध्ये प्रवेश
Next Article गर्दीत जाण्याची सवय नसल्याने राहुल गांधी धडपडून खाली पडले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?