Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला उपभोग्य वस्तू असा संघ, भाजपाचा दृष्टिकोन तर मोदी मौनीबाबा – आंबेडकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महिला उपभोग्य वस्तू असा संघ, भाजपाचा दृष्टिकोन तर मोदी मौनीबाबा – आंबेडकर

Surajya Digital
Last updated: 2020/10/05 at 4:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : हाथरस अत्याचार घटनेवरुन आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर देखील निशाणा साधला आहे. महिला म्हणजे उपभोग्य वस्तू असा संघ आणि भाजपाचा दृष्टीकोन असल्याचं प्रकाश आंबेडकर पुण्यात म्हणाले आहेत.

“उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. सर्व स्तरातून हा निषेध नोंदवला गेला ही चांगली गोष्टं असं मी मानतो.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तरूण पिढी आता महिलांवरील अत्याचारांकडे एका वेगळ्या नजरेतून पाहताना दिसत आहे. आरएसएस-भाजपा हे महिला उपोभगण्याची वस्तू आहेत, असा प्रचार आणि प्रसार करतात. ती महिला आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे आणि तिचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत. तिला जसं जगायचं आहे, तसं तिला जगता आलं पाहिजे. तिच्यावर कुणी अत्याचार करू नये, अशा पद्धतीने असलेली माणसिकता नव्या पिढीकडे आहे. ही नवी पिढी मला देशभरात रस्त्यावर उतरलेली दिसत आहे.” असं यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवलं.

मोदींनी मुरादबादमधील दंगलीबाबतही काही बोलले नाही, हा मौनी बाबा आहे. मी तरुणांना एवढंच सांगेन की, जो काही प्रचार आणि अपप्रचार सुरू आहे त्याला बळी पडू नये. तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे का आता अत्याचार कुणी सहन करणार नाही. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे. सध्या कायद्याची आहे ती व्यवस्था तरूण पिढीने टिकवली पाहिजे. असं देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी तरूणांना आवाहन केलं.

“पीडित कुटुंबाकडून जे काही आरोप केले जात आहेत. पोलीस किंवा एसआयटी त्यांना सूचना असल्याशिवाय स्वतःहून कधीही धमकावू शकत नाही. त्यांना या सूचना कोण देणार? तर राजकीय नेतृत्वच त्यांना या सूचना देणार. म्हणूनच त्या कुटुंबाने जी मागणी केली आहे की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने एका न्यायाधीशाची नेमणूक केली जावी आणि त्यांच्याच नियंत्रणाखाली ही चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळेल. या मागणीला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #प्रकाशआंबेडकर #हाथरस #स्त्री #उपभोग्यवस्तू #भाजपासंघ #दृष्टिकोन #मोदीमौनीबाबा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रियांका गांधींची नोएडा पोलिसांनी माफी मागून दिले चौकशीचे आदेश
Next Article हाथरस पीडित कुटुंबियास भेटण्यास आणखीही विरोधच; शाई फेकण्याचा प्रकार घडला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?