Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास दिली परवानगी; मंदिरे उघडण्याच्या हालचाली सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास दिली परवानगी; मंदिरे उघडण्याच्या हालचाली सुरु

Surajya Digital
Last updated: 2020/10/06 at 12:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अनलॉक 5 च्या नियमावलीनुसार राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले आहेत. आता मंदिरे व इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात एसओपी जारी करण्यात आली असून 15 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरला आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या घोषणेपासून बंद असलेली चित्रपटगृहे आता लवकरच सुरु होणार आहेत. केंद्र सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे एसओपी जारी केली आहे.

राज्यातील रेस्टॉरंट, बार सुरू झाले. पुनश्च हरिओम अंतर्गत सरकार हे करू शकते तर धार्मिक स्थळं का उघडत नाही, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटली. रेस्टॉरन्ट, बार हे ५० टक्के क्षमतेने उघडण्यास अनुमती देण्यात आली आहे पण धार्मिक स्थळांबाबत अशी अट टाकणे शक्य नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री संबंधितांशी चर्चा करीत असल्याची माहिती आहे. विविध राज्यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. महाराष्ट्रात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली होती. मंदिरांच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांना भेटून मागणी रेटली. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चित्रपटगृहात सुरुवातीला केवळ 50 टक्केच प्रेक्षकांना उपस्थिती लावता येणार आहे. सिनेमा, थेटर्स, मल्टीप्लेक्स टॉकीज 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याचे, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

यापूर्वी सिनेमा हॉल उघडण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी ५० टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र, मंत्रालयाला वाटते की, सुरुवातीला २५ टक्के प्रेक्षकांसह सिनेमा हॉल सुरु करावे आणि नियमांची काटेकोरपणे करण्यात यावे.

दरम्यान, मार्चमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉकडाऊन जूनपर्यंत सुरु होता. त्यानंतर ३० जूनला अनलॉक-१ अंतर्गत कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शिथिल झाला. ज्यामध्ये आर्थिक निर्बंध उघडले गेले. त्यानंतर, १ जुलैपासून अनलॉक -२ सुरु झाला आहे. आता अनलॉक-5 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे आणि सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #सिनेमागृहे #चालू #केंद्रसरकार #मंदिरे #उघडण्याच्या #हालचाली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article होय…! नोटांमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका – आरबीआय
Next Article नवले पुलाजवळ 15 गाड्यांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?