मुंबई : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. भेटीत त्यांनी काही पुरावे पोलीस आयुक्तांना सादर केले. सुशांत सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी फेक अकाऊंट तयार करण्यात आले असून, या मागे भाजपाच्या आयटी सेलचा हात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
नृ
या सर्व अकाऊंटची चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. या देशात लोकशाही संपवण्याचा कट सुरू आहे, सुशांतसिंह प्रकरणात फेसबुक, ट्विटरचा वापर केला जात असून, काही निवडक चॅनेलसुद्धा अपप्रचार करत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. खरं तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयच्या हाती काही धागेदोर सापडले आहेत. तेव्हापासून मुंबई पोलिसांच्या तपासावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता काँग्रेसनेही सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून भाजपाला धारेवर धरले आहे.
* बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी
सुशांतसिंह प्रकरणात जनमत तयार केले आणि त्यावरच भाजप नेत्यांनी वक्तव्ये केली. मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम केले. बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी केली जातेय. आम्ही सर्व गोष्टींच्या तळापर्यंत गेलो, तेव्हा सोशल मीडियावरचा टेरेरिझम हा भाजपापुरस्कृत असल्याचं लक्षात आलं. पालघरमध्येही भाजपानं तेच केलं. ट्विटरबाबत आम्ही जी माहिती गोळा केली ती पोलिसांना दिली आहे, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत. सुशांत प्रकरणात काही ट्रेंड चालवले जात आहेत. जुलै महिन्यात खाती तयार झाल्यानंतर त्यावरून 45 हजार ट्विट केली गेली.
* भाजपा आयटी सेलची कार्यपद्धती
मिनिटाला 25 ट्विट्स पडत होते. यात काही एजन्सींचाही हात होता. त्यांना फॉलो करणारी फेक अकाऊंट आहेत. मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे आणि सरकारला बदनाम करण्यात आले. या सगळ्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. भाजपाला याचा फायदा झाला आहे. भाजपाच्या आयटी सेलची ही कार्यपद्धती आहे. आम्ही जी तथ्यं गोळा केली, त्यातून हे भाजपापर्यंत पोहोचणार आहे. ही कार्यपद्धती भविष्यात वापरली गेल्यास विरोधी पक्षाचे सरकार कसे काम करणार?, या प्रकरणी चौकशी सुरू आहे. यातील मास्टर माइंड पकडले पाहिजेत, असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.