नवी दिल्ली : महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनी आपल्या हटके गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 15 ऑगस्ट 2020 ला महेंद्रा कंपनीनं आपल्या ‘SUV थार’ या नवीन जनरेशनवरून पडदा हटवला होता. महेंद्रा कंपनीनं आता आपली थारची न्यू ब्रँड ऑफ-रोडर बाजारात आणली आहे. महिंद्रा कंपनीची यावर्षीची ही सर्वात मोठी लाँचिंग आहे.
थारला लॉच करण्यापूर्वी महिंद्रा कंपनीनं या गाडीचा लिलाव करण्याचं ठरवलं. 24 सप्टेंबरपासून कंपनीनं कोरोना महामारीशी लढण्यासाठी हा लिलाव सुरु केला होता. महिंद्रा कंपनीनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर न्यू थारच्या लिलावाची बोली सुरु केली होती.
SUV थारच्या या ऑनलाईन लिलावात 29 सप्टेंबरच्या सकाळी बोली 80 दशलक्षांच्या पुढे गेली होती. लिलावाची अंतिम तारीख 27 सप्टेंबर होती. मात्र, पुन्हा ही तारीख दोन दिवस वाढवून 29 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती. 29 सप्टेंबर हा लिलावाचा शेवटचा दिवस असल्यानं या दिवशी लिलावाची किंमत 1 कोटी पर्यंत जाणं अपेक्षित होतं. मात्र, थारची अंतिम बोली तब्बल 1.10 कोटीच्या पार गेली आहे.
महिंद्रा ऑटोमोटिव्हने या थारची बुकिंग सुरू केली आहे. देशातील 18 शहरांमध्ये थारची टेस्ट ड्राइव्ह सुद्धा सुरू करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून नवीन महिंद्रा थार ग्राहकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनीच्या 75 व्या संस्थापक दिनानिम्मित 2 ऑक्टोबरला गाडी भारतात लॉच केली गेली आहे. थारच्या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम कोरोना महामारीशी लढण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
* कारविषयी थोडक्यात
महिंद्रा SUV थार दिसायलाही अगदी आकर्षक आहे. महिंद्रा थार एएक्स एसी ट्रीमची किंमत 9.80 लाख रुपयांपासून सुरुवात होते. तर महिंद्रा थार एलएक्स एसी ट्रीमची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे. थार पूर्वीच्या बॉक्सरी डिझाइनवर बनवली गेली आहे. मात्र, नवीन थार 2020 मागील मॉडेलपेक्षा आकारात मोठी आहे. या थारला हार्ड टॉप आणो सॉफ्ट टॉप असे दोन्ही पर्याय दिले गेले आहेत. तसेच या थारची फिनिशिंगही उत्तम आहे.
2020 महिंद्रा थारच्या एसयूव्हीला अनेक इंजिन पर्याय आणि उपकरणे दिली गेली आहेत. एलएक्स व्हेरिएंटसह 18 इंच अलॉय व्हील्स, स्वयंचलित गिअरबॉक्स तसेच इतरही काही महत्वाच्या गोष्टी या थारमध्ये देण्यात आल्या आहेत. महिंद्रा थारचं इंजिनसुद्धा अतिशय उत्तम बनविण्यात आलं आहे.
महिंद्रा ऑटोमोटिव्हने थार ऑफ रोडिंग बरोबर फोर-व्हील लो, फोर-व्हील हाय आणि टू-व्हील ड्राइव्ह मोडसह मेकॅनिकल 4 बाय 4 ट्रान्सफर केसची सुविधा दिली आहे. नवीन थारच्या पुढील भागात स्वतंत्र सस्पेंशन दिलं आहे. तर मागील भागात मल्टी लिंक युनिट दिलं गेलं आहे.