मुंबई : मध्य रेल्वेने सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई ते कोल्हापूरसह आणखी आठ गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात बहुतांशी वातानुकूलित एक्सप्रेसचा समावेश आहे. या गाड्याचे आरक्षण 9 आणि 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात लांबपल्ल्याचा प्रवास करणा-या प्रवाशांची सोय होणार आहे.
* या आहेत आठ गाड्या
या आठ गाड्यामध्ये मुंबई-कोल्हापूर स्पेशल डेली, मुंबई -लातूर सुपरफास्ट स्पेशल आठवडय़ातून चार दिवस, पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन, कोल्हापूर-गोंदिया स्पेशल डेली ट्रेन, मुंबई-नांदेड स्पेशल डेली ट्रेनचा समावेश आहे.
* असे आहे वेळापत्रक
ट्रेन क्र.01029 मुंबई-कोल्हापूर स्पेशल डेली 13 ऑक्टोबरपासून दररोज सीएसएमटीहून स.8.40 वा.हून सुटून कोल्हापूरला रा. 8.25 वा. पोहचेल. ट्रेन क्र.22107 मुंबई-लातूर सुपरफास्ट स्पेशल 11 ऑक्टोबरपासून आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरूवार, आणि रविवारी सीएसएमटीहून रा.9 वा. सुटून सकाळी 6.30 वा. पोहचेल. ट्रेन क्र. 01417 पुणे – नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन 15 ऑक्टोबरपासून दर गुरूवारी पुण्याहून रा.10 वा. सुटून दु.1.30 वा. नागपूरला पोहचेल. ट्रेन क्र.02239 पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन 17 ऑक्टोबरपासून दर शनिवारी पुणे येथून रा.10वा. सुटून अजनी येथे दु.1.15 वा. पोहचेल. ट्रेन क्र.02117 पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन 14 ऑक्टोबरपासून दर बुधवारी पुण्याहून दु.3.15 वा. सुटून अमरावतीला रा.3.15 वा. पोहचेल. ट्रेन क्र. 02224 अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक ट्रेन 13 ऑक्टोबरपासून दर मंगळवारी अजनीहून रा.7.50 वा. सुटेल आणि पुण्याला स.11.45 वा. पोहचेल. ट्रेन क्र.01039 कोल्हापूर-गोंदिया स्पेशल डेली ट्रेन 11 ऑक्टोबरपासून कोल्हापूरहुन रोज दु.3.30 वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी रा.8.15 वा. पोहचेल. ट्रेन क्र.01141 मुंबई-नांदेड स्पेशल डेली 11 ऑक्टोबरपासून सीएसएमटीहून दररोज सुटून दुसऱ्या दिवशी नांदेडला पोहचेल.