Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या; भाजपा खासदाराचा अजब सल्ला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या; भाजपा खासदाराचा अजब सल्ला

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 3:48 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष हे अजब वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत. परत त्यांनी एक वक्तव्य केले असून ते गाजत असून त्यावर टीकाही होत आहे.

दिलीप घोष यांनी लोकांना कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिलाय. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असंही दिलीप घोष यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

दिलीप घोष यांनी पहिल्यांदाच असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. याअगोदरही ते अशी वक्तव्य करून चर्चेत आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिलीप घोष यांनी ‘गाईच्या दुधात सोनं असतं’ असं म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले होते. त्या अगोदर ‘गोमूत्र पिण्यात कोणतीही अडचण नाही. मी स्वत: गोमूत्राचं सेवन करतो’ असंही त्यांनी म्हटलं होतं.

या व्हिडिओमध्ये दिलीप घोष एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगत आहेत. यावेळी, त्यांनी गोमूत्र पिल्यानं लोकांचं आरोग्य सुधारतं, असा दावाही केला.

‘मी जर गाईबद्दल बोलायला लागलो तर अनेक जण असहज होतील. गाढवं कधीही गाईची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गाईची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गाईचं महत्त्व कसं काय लक्षात येईल’ अशी मुक्ताफळं उधळताना घोष या व्हिडिओत दिसत आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #खासदार #अजबवक्तव्य #घोष #भाजपाखासदार #कोरोना #गोमूञ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवमंदिरात अवतरले गंधर्व …
Next Article माढा पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस कोरोनाबाधित; पोलीस प्रशासनासह माढेकरांचे टेन्शन वाढले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?