Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मराठा क्रांती मोर्चा : एमपीएससी परीक्षा केंद्रे फोडणार; सांगलीत बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चा : एमपीएससी परीक्षा केंद्रे फोडणार; सांगलीत बैठक

Surajya Digital
Last updated: 2020/10/09 at 5:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : राज्य सरकारमार्फत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाने परीक्षा रद्द करण्याची मागणी केली, अन्यथा गनिमी काव्याने परीक्षा केंद्रे फोडू, अशा इशारा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सांगली शहरातील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनमध्ये आज शुक्रवारी मराठा समाजाच्या नेत्यांची जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठकीत सांगलीत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन एमपीएससी परीक्षेला विरोध दर्शवला. राज्य सरकारने तातडीने परीक्षा फुढे ढकलावी, अन्यथा राज्यभर परीक्षा केंद्रे फोडून परीक्षा उधळून लावली जाईल, अशा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याबाबत माहिती देताना सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय देसाई म्हणाले, ‘मराठा समाजाने विरोध दर्शवल्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरती प्रक्रिया जाहीर केली. हा प्रकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला उसकवण्याचा आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा स्थगित करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सरकार केवळ चर्चेचे नाटक करीत आहेत. विरोध डावलून परीक्षा घेतल्यास राज्यभरातील परीक्षा केंद्रे फोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याला राज्य सरकार जबाबदार असेल.’ बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिका-यांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगलीबैठक #मराठाआरक्षण #एमपीएससी #परीक्षा #रद्द #गनिमीकावा #उधळून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मार्निंग वॉकला गेलेल्या भाजपा आमदाराच्या मामाची गोळ्या घालून हत्या
Next Article भाजपाची एकहाती सत्ता असलेल्या जळगाव महापालिकेत पैशांवरुन भाजपा पदाधिका-यांनी उगारल्या खुर्च्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?