Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुड न्यूज : पुढीलवर्षी सोलापूर, रत्नागिरीत सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी कॉलेज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

गुड न्यूज : पुढीलवर्षी सोलापूर, रत्नागिरीत सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी कॉलेज

Surajya Digital
Last updated: 2020/10/09 at 9:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर व रत्नागिरीत पुढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायंकाळी सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. प्रणिती शिंदे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे आज पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात परीक्षांचा आढावा घेण्यासाठी आले होते. या वेळी ते म्हणाले, सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. त्यानुसार पुढील वर्षी राज्यातील रत्नागिरी व सोलापूर या दोन ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सोलापुरात शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या जोडीला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असेल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत असणार आहे. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मागणी केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* नियोजनबद्ध सायबर हल्ला

पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मुंबई, पुणे, सोलापूर व अन्य विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षेवेळी सायबर अटॅक झाल्याने सर्व्हेर क्रॅश होऊन परीक्षांमध्ये व्यत्यय आला आहे. हा नियोजनबद्ध सायबर हल्ला आहे. त्यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रार करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या आॅनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायंकाळी सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.

* मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्याचा शुभारंभ

सोलापूर विद्यापीठाच्या आवारात अडीच लाख रूपये खर्चुन अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ २८ किंवा २९ आॅक्टोबरला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्याचे नियोजन असल्याचे सामंत यांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठ कर्मचा-यांचे सातव्या आयोगासाठी आंदोलन सुरू आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

* मंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहिती

– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विद्यापीठ परिसरात पुतळा उभारणार, त्यासाठीचा खर्च राज्य शासन आणि विद्यापीठ संयुक्तरित्या करणार.

– पुतळ्याचे भूमीपुजन याच महिन्यात करण्याचा राज्य शासनाचा मानस.

– विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन सुरु करणार.

– विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू करणार.

– रत्नागिरी आणि सोलापूर येथे पुढील शैक्षणिक वषार्पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार.

– तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांच्या थकित वेतन आदा करण्यासाठी निधीची तरतूद करणार.

– तासिका तत्वावर भरतीसाठी सेट नेट उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार.

– प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करता यावी यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #रत्नागिरी #पुढीलवर्षी #अभियांत्रिकी #कॉलेज #सुरु #उदयसामंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारच्या तीन विकेट निश्चित; पहिली विकेट जितेंद्र आव्हाडांची जाणार, भाजपा नेत्याचे भाकित
Next Article काळ्या पैशाच्या लढाईत मोदी सरकारला मोठे यश; स्वीस बँकेने दुसरी यादी दिली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?