चेन्नई : जाती व्यवस्था अजूनही इतकी खोलवर रुतलेली आहे, याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण पहायला मिळालं आहे. एका महिला सरपंचाला केवळ मागास जातीची आहे म्हणून, ग्रामपंचायतीच्या बैठकीत खाली बसायला लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जातीव्यवस्था नष्ट झाली, तसेच आरक्षण बंद करा, म्हणणा-याच्या तोंडात सणसणीत चपराक आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित महिला सरपंचला कोणत्याही समारंभात मान दिला जात नाही. उपसरपंच त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात आणि महिला सरपंचला अपमानास्पद वागणूक देत असल्याचं स्पष्ट झालंय. तमीळनाडूच्या चुद्दलोर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. याप्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला वाचा फुटली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फोटोमध्ये दिसणारी माहिला थेरकू थित्ताई गावाची सरपंच आहे. संबंधित महिला ही आदी द्रविड समाजाची असून, या समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये केला जातो. गेल्या वर्षी सरपंचपद राखीव आल्यानं तिला सरपंच होण्याची संधी मिळाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतील असून, या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनच कानावर आला आहे.
माझ्या जातीमुळं उपसरपंच मला ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊ देत नाहीत. झेंडा वंदनाचाही मान मला देण्यात येत नाही. ते त्यांच्या वडिलांना हा मान देतात. निवडून आल्यानंतर मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी सहकार्याच्या भावनेने काम करत आहे. पण, माझ्याबाबतीत अशी वागणूक दिली जात आहे. आता डोक्यावरून पाणी जात आहे, असे सरपंच, थेरकू थित्ताई यांनी सांगितले.
आम्ही घटनेची चौकशी सुरू केली आहे. लवकरच आपल्याला नेमकं काय घडलंय, याची माहिती मिळेल. प्राथमिक चौकशीनंतर आम्ही ग्रामसेवकाला निलंबित केले असल्याचे चंद्र शेखर सखामुरी, जिल्हाधिकारी यांनी सांगितले.