पाटना : गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपाने या ठिकाणी निवृत्त पोलीस हवालदार परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंचा भाजपाने पत्ता कट केलाय. महाराष्ट्राची बदनामी करणा-या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का, असा सवाल महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना केला होता.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वेच्छानिवृत्ती घेवून जदयूमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहारच्या माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा अखेर पत्ता कट झाला आहे. पांडे यांना जदयूने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, भाजपाने निवृत्त पोलीस हवालदाराला उमेदवारी देवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाने चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना झटका बसला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिआरस घेत निवडणुकीपूर्वी जेडीयूमध्ये प्रवेश केला. पण जेडीयूकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यापूर्वी जेडीयूने आपल्या ११५ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नव्हते.
गुप्तेश्वर पांडे यांना ज्या बक्सर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती तो मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. जेडीयूने त्यांना उमेदवारी न दिल्याने भाजपकडून त्यांना बक्सरमधून उमेदवारी दिली जाईल, चर्चा होती. पण भाजपने बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांचे नाव जाहीर केले तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या आपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं. “आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे,” गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
माझी जन्मभूमी बक्सर आहे. तिथल्या सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले