नवी दिल्ली : तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवणाऱ्या सायरा बानो यांनी काल (शनिवार) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडच्या डेहराडून येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत आणि प्रदेश महामंत्री संघटन अजय कुमार यांच्या उपस्थितीत त्यांना पार्टीचे सदस्यत्व देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष भगत म्हणाले की, बानो यांनी ज्या प्रकारे तीन तलाक विरोधात आवाज उठवला, तशाच प्रकरे त्या पक्षाच्या सिद्धांत पुढे घेऊन जातील. विशेषकरून अल्पसंख्याक समाजातील महिलांपर्यंत भाजापाचे विचार पोहचवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहील. बानो यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे की, जर त्यांना संधी मिळाली तर त्या २०२२ मध्ये होणारी उत्तराखंडमधील निवडणूक देखील लढवतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मूळच्या उत्तराखंडमधील काशीपूर येथील असलेल्या सायरा बानो यांनी पहिल्यांदा तिहेरी तलाक, बहूपत्नीकत्व व निकाह हलालावर बंदीची मागणी केली होती. तसेच, यावरूनच २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती.
“जर पक्ष मला पुढे नेत असेल, तर मी बिहारमधून भाजपासाठी राजकीय कार्याची सुरूवात करू इच्छित आहे. मी लोकांना भाजपाच्या विचारधारेबद्दल सांगेन, ज्यामुळे मी पक्ष प्रवेश करण्यासाठी प्रेरीत झाले आहे. भाजपाकडून अल्पसंख्यांकासाठी केल्या गेलेल्या कामांबद्दल मी माहिती देईन. विशेष करून मुस्लीम समाजातील महिला व उपेक्षित समाजामधील अन्य लोकांसाठी मला पक्ष जे काम सोपवेल ते मी करेन.” असं सायरा बानो यांनी सांगितलं आहे.