Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खूशखबर..! रेल्वे खात्यात मोठी भरती प्रक्रिया; तारीखही जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थदेश - विदेश

खूशखबर..! रेल्वे खात्यात मोठी भरती प्रक्रिया; तारीखही जाहीर

Surajya Digital
Last updated: 2020/10/12 at 9:30 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

दिल्ली : भारतीय रेल्वे खात्यातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच होणार आहेत. रेल्वे खात्यात एकूण 1 लाख 40 हजार 640 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे.

रेल्वे मंत्रालायने विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 15 डिसेंबर 2020 ला या परीक्षा होणार असल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयारीही सुरु केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान कोरोना महामारीमुळे या परीक्षा रखडल्या होत्या. अनेक इच्छुक परीक्षा लांबल्यामुळे नाराज झाले होते. परीक्षेच्या नव्या तारखा कधी जाहीर होणार?, याची वाट सर्व ते पाहत होते. आता येत्या डिसेंबरमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय रेल्वेत एकूण 1,40,640 विविध पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या मेगाभरतीसाठी यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. परीक्षेसाठी एकूण 2.40 कोटी अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सर्व जागा विविध श्रेणीच्या पदांसाठी आहेत. कोरोना महामारीमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) लांबणीवर टाकावी लागली होती.

* या श्रेणींसाठी होणार परीक्षा

– 35,208 जागा बिगर तांत्रिक गट (NTPC) (गार्ड, लिपिक, क्लर्क)
– 1,663 जागा मंत्रालयीन स्तर (स्टेनो)
– 1,03,769 जागा ट्रॅकमन, पॉईंटमन

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #रेल्वेभरती #मोठीप्रक्रिया #भारतीयरेल्वे #खूशखबर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हाथरस प्रकरणी सीबीआयने दाखल केला हत्येचा गुन्हा; कुटुंबाचा रात्रीचा प्रवास करण्यास नकार
Next Article मराठवाडा, नागपुरात वीज कोसळली; सहाजणांचा मृत्यू

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?