सोलापूर : माझं उर्वरित आयुष्य माझ्या कुटुंबीयांसमवेत घालवावे, यामूळे माझ्या सोलापूर या मूळगावी मी आलो आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे, मला अनेक गोष्टीवर लेखन करायचे आहे आणि त्याचा फायदा मला सोलापुरात होईल, असे मत सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी मारुती चित्तमपल्ली सोलापुरात आल्यानंतर आज सोमवारी त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऋषीप्रमाणे दाढी वाढलेली अंगात शर्ट व कमरेला लुंगी गुंडाळलेली चेहरा थकलेला तोंडावर फेसशिल्ड घातलेला होता. परंतु लिहिण्याची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
लेखनासाठी आवश्यक असणारी पुस्तकं हिराचंद नेमचंद वाचनालया तर्फे आपणास उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ.श्रीकांत येळेगावकर यांनी दिले.