Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? खून करणार आहेत का ? शिवसेनेला जाहीर आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? खून करणार आहेत का ? शिवसेनेला जाहीर आव्हान

Surajya Digital
Last updated: 2020/10/13 at 5:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसवा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. यानंतर छत्रपती घराण्याचे समर्थक आणि मराठा संघटनांचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आक्रमक झाले होते.

* शिवसेनेला जाहीर आव्हान

ते काल सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन सेनेवर पलटवार केला. मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचे भाकीत

प्रकाश आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातंर्गत आदेश काढत आहे.

केंद्र सरकारने नुकत्या मंजूर केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करण्यास महाविकासआघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. ही एक प्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने राज्याला अशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार दिलेला नाही. केंद्र सरकारने एखादा कायदा मंजूर केल्यास राज्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी विधेयक लागू करण्यास नकार दिल्यास कलम 356 अंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #प्रकाशआंबेडकर #शिवसेनेला #आव्हान #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, माझ्या हिंदुत्वात बसत नाही”
Next Article फडणवीसांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची दांडी; खडसेंचा फडणवीसांवरील रोष कायम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?