श्रीपूर : कोरोना विषाणूंची साथ जगभरात थैमान घालत आहे. यासाठी जागतिक हात धुणे दिवसाच्या निमित्ताने युनिसेफ आणि सी.वाय.डी.ए च्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून या अभियानासाठी जिल्हा परिषद शाळेतील दहा वर्षाची सिझा दादासो मुलाणी (इ.४थी) या मुलीची एकमेव निवड झाली आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) व सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड एक्झिक्यूटिव्ह (सी.वाय.डी.ए.) याच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हात धुणे स्पर्धा जनजागृती अभियान राबविण्यात आले. जागतिक हात धुणे दिवस” च्या निमित्ताने “हाताची स्वच्छता सर्वांसाठी” या मोहिमे अंतर्गत ११ ऑक्टोबर रोजी वर्ग ४ थी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याबाबत जनजागृती करणारा स्वतः तयार केलेला व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या मोहिमेचा उद्देश जास्तीत जास्त मुलांनी हात धुण्याचे महत्त्व कळावे, त्याच प्रमाणे मुलांच्या मध्यमातून समाजामध्ये हात धुण्याच्या सवयी बाबत जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. या मोहिमेचे हात धुणे दिनाची संकल्पना हाताची स्वच्छता सर्वांसाठी असून या अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातील शाळकरी मुला-मुलींनी प्रतिसाद दिला.
संपूर्ण राज्यातून आलेल्या व्हिडीओपैकी उत्कृष्ट १० व्हिडीओंची निवड केली आहे. त्या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जि.प.प्रा.शाळा मुंडफणेवाडी महाळुंग ता.माळशिरस येथील सिझा दादासो मुलाणी (इ.४थी) हिने सहभाग नोंदवला होता. तिचा जिल्ह्यांमधील एकमेव विद्यार्थी म्हणून तिची निवड झाली आहे. तिने हात धुण्याचे गाणे म्हणून व्हिडिओ तयार करून युनिसेफ या संस्थेला पाठवून दिला होता. युनिसेफ जनजागृती अभियान तिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक समीर लोणकर, शिक्षका अर्चना वाघ यांनी मार्गदर्शन केले.