Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: असमर्थ ठरल्यानंतर प्रमाणपत्र नक्कीच गरजेचे; अमृता फडणवीसांची पत्राच्या ‘राजकारणात’ उडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

असमर्थ ठरल्यानंतर प्रमाणपत्र नक्कीच गरजेचे; अमृता फडणवीसांची पत्राच्या ‘राजकारणात’ उडी

Surajya Digital
Last updated: 2020/10/14 at 2:02 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्रव्यवहाराचे ‘वॉर’ झाले. यात राज्यातून महामहीम राज्यपाल कोश्यारी हे राजकारणात टीकेची धनी बनले आहेत. या पत्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘वाह प्रशासन’ म्हणत उडी घेतली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. राज्यभरातून मंदिरं उघडण्यासाठी मागणी होत आहे. अशातच आता मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बार आणि दारूची दुकानं सताड उघडी असताना मंदिरं मात्र डेंजर झोन आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. ‘वाह प्रशासन’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.

असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं असतं, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राज्यपालांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी वापरलेले शब्द नक्कीच ठाकरे सरकारवर निशाणा साधणारे आहेत.

राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. “बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवाचं कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?” असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले होते.

या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं होतं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #अमृताफडणवीस #राज्यपाल #मुख्यमंत्री #पत्रव्यवहार #राजकारण #असमर्थ #प्रमाणपत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर; मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली माहिती
Next Article गुजरातमध्ये ‘तनिष्का’ शोरुमवर हल्ला; जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहित करणारी असल्याचा आरोप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?