Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुजरातमध्ये ‘तनिष्का’ शोरुमवर हल्ला; जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहित करणारी असल्याचा आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

गुजरातमध्ये ‘तनिष्का’ शोरुमवर हल्ला; जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहित करणारी असल्याचा आरोप

Surajya Digital
Last updated: 2020/10/14 at 3:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : टाटाच्या ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहिरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाल्यामुळे ही जाहिरात ‘तनिष्क’ला मागे घ्यावी लागली आहे. गुजरातमध्ये ‘तनिष्क’च्या ज्या शोरूमवर हल्ला झाला, तिथल्या मॅनेजरला जमावाला माफीनामा लिहून द्यावा लागला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

“ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटले आहे. गुजरातच्या गांधीधाममधील ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.

‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवड्यामध्ये यू-ट्युब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळजेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते.

* काँग्रेसकडून स्वागत तर भाजपाकडून विरोध

काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र भाजप नेत्या कोटापल्ली गीता आणि यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर कंपनीने ही जाहिरात समाज माध्यमांवरून मागे घेतली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #तनिष्काशोरुम #हल्ला #गुजरात #लव्हजिहाद #प्रोत्साहित #जाहिरात #स्वागत #विरोध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article असमर्थ ठरल्यानंतर प्रमाणपत्र नक्कीच गरजेचे; अमृता फडणवीसांची पत्राच्या ‘राजकारणात’ उडी
Next Article विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे नावे निश्चित; शेट्टी, जानकर, शिंदे तर चौथे नाव खडसे? मोहोळची संधी हुकली

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?