सांगली : सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक शिराळा या बँकेत ३० कोटी ७८ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याबाबत विद्यमान अध्यक्ष यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ६५ जणांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे तालुक्यात ठेवीदारांसह नागरिकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात अनिल सच्चिदानंद पैलवान (वय ५१, विशेष लेखा परिक्षक रा.सांगली) यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीत २ एप्रिल २०११ ते २९ फेब्रुवारी २०२० च्या दरम्यान स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे म्हटले आहे. या बँकेत व त्या अंतर्गत शाखांमध्ये ठेवींच्या व सभासद भागभांडवलाच्या रक्कमेतील रोख शिल्लक रक्कमेतून १ कोटी ३ लाख ८१ हजार ६०४, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी. बँक शाखा – महावीरनगर , सांगली या शाखेतून रु. ८ लाख रुपये बेकायदेशीरपणे आर.टी.जी.एस. करुन अपहार केल्याचे समोर आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विनातारण जामीन व शेती कर्जातून २८ कोटी ६७ लाख ३९ हजार १८६ रुपये मलकापूर शाखेतून अपहार केल्याचे समोर आले आहे. तसेच वाहन तारण कर्जातून १२ लाख २८ हजार ५०० तसेच स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष असलेल्या मूल्यांकनापेक्षा अधिक दाखवून १ कोटी ९८ लाख ६० हजार ६२४ असा एकूण ३० कोटी ७८ लाख २८ हजार ३१० रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे म्हटले आहे.
या घटनेत गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील करत आहेत.
संशयित आरोपी विद्यमान अध्यक्ष संजय हंबीरराव नाईक, संचालक- हंबीरराव सर्जेराव नाईक ( मयत ), दिनकर दौलू पाटील, सुधाकर व्यंकटेश हसबनीस, उदयसिंग सर्जेराव नाईक, भगतसिंग वसंतराव नाईक, संपतराव निवृत्ती पाटील, शामराव धोंडीबा सावंत, पांडुरंग शंकर शिंदे, रघुनाथ तुकाराम बंडगर, हमजा इमाम सुतार, प्रकाश रावजी धस, विमलाताई शिवाजीराव चव्हाण, श्रीमती उज्वला बाबूराव पाटील, शिवाजी आण्णा रावते, दिनकर नरसू घाडगे, ज्ञानदेव निवृत्ती मिरजकर, अरविंद आबासो पवार, दिलीपराव महादेवराव सोनटक्के हे या १९ संचालकांची नावे
आहेत. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह बाबासाहेब घोरपडे, दिलीप शामराव पाटील, पांडुरंग नामदेव कुंभार यांच्यासह शाखाधिकारी, रोखपाल, पासिंग अधिकारी, कर्जदार, मुल्यांकनकार व अन्य अज्ञात त्रयस्थ असे ४६ तर एकूण ६५ जणांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता संगनमताने बोगस कर्जप्रकरणे तयार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.