पंढरपूर : पंढरपूर हे तीर्थक्षेञ असल्याने सरकार कोणाचेही असो… भाविकांच्या सोयीसुविधेसाठी प्रत्येकवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. माञ या निधीचा सदुपयोग होत नसुन निकृष्ट ठ दर्जाची कामे होत असल्याने भाविकांसह स्थानिक नागरिकांना देखील याचा ञास सहन करावा लागतो. बुधवारी दुपारी कुंभार घाटाजवळील निकृष्ट कामामुळे पावसाच्या आडोश्याला बसलेल्या सहा जणांचा मृत्यु झाला.
या निकृष्ट कामाची चौकशी करुन ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. याचबरोबर मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन पालकमंञी दत्ताञय भरणे यांनी दिले. याचबरोबर पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, केळी, ऊस, मका यासह शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
भिंत पडलेची घटना समजताच तात्काळ प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. मंगळवारी राञीपासून पंढरपुर शहरासह तालुक्यात सुरु झालेला पाऊस बुधवारी दिवसभर सुरु आहे. या सततच्या पाऊसामुळे भिमा नदी दुथडी भरुन वाहत आहे. जुना दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. धरण परिक्षेञात पाऊस सुरु असल्याने उजनी व वीर धरणातून १ लाख २० हजार क्युसॆस पाणी भिमा नदी पाञात सोडण्यात येणार असलेने नदिकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये ३५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. माञ उजनी व वीर धरणातून पाणी सोडणेत येणार असलेने पंढरपूरला पुरपरिस्थिती निर्माण होणार आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणेचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘या’ सहा जणांचा झाला मृत्यू
कुंभार घाटाजवळील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यु झाला. यामध्ये गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय ७०), राधाबाई गोपाळ अभंगराव (वय -५०), संग्राम उमेश जगताप (वय- 13), राजु अभंगराव यासह दोन वारकरी महिलांचा मृत्यु झाला आहे.
* जिल्हाधिकारी नारायण चिंचोलीतून गेले परत
भिंत पडून सहा जणांचा मृत्यु झाल्याचे समजताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे पंढरपूरला पाहणी करण्यासाठी येत होते. माञ नारायण चिंचोली येथील रस्त्यावर पाणी आलेने जिल्हाधिकारी तेथूनच परत गेले.
* पंढरपूरला पूरपरिस्थिती
सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. भिमा नदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. उजनी धरण व वीर धरणातून १ लाख २० हजार क्युसेस पाणी भीमा नदित सोडण्यात येणार आहे. यामुळे पंढरपूरला पूरपरिस्थिती उद्भवणार असुन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.