सोलापूर / पंढरपूर/ विरवडे बु : जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनावरे दगावण्याची तसेच घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी सुरु झालेला पाऊस बुधवार रात्रीपर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे.
तालुक्यातील, मोहोळ -वैराग, सोलापूर -मंगळवेढा -कोल्हापूर, विरवडे -पाकणी आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात केले आहेत. सीना नदीकाठच्या अनेक गावात पाणी शिरले आहे.
मोहोळ तालुक्यातील नदी काठच्या मुंडेवाडी, विरवडे बु, विरवडे खुर्द, पाकणी, शिवणी, शिरापूर, शिंगोली, पीरटाकली आदी नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेकांची घरे पाण्यात गेली आहेत दोन दिवस पडणऱ्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेती पिकांचे द्राक्षे, ऊस, सोयाबीन, तुरी, मका , कडवळ आदी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतातील सकल भागात पाणी साचले आहे. ओढे आणि नाले भरभरुन वाहत आहेत. त्यामुळे शेतातील माती आणि बांध वाहून जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, असे आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
तर अनेक गावांत ऊस तोडणी कामगार आले आहेत. त्या लोकांसाठी गावातील प्राथमिक शाळा उघडून देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. कामती पोलीस नदी काठच्या गावांना माईकवरून सूचना देत आहेत.
* पुणे – सोलापूर हायवे बंद
पुणे – सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला असून उजनी धरणाचे पाणी भिगवण,डाळज,पळसदेव,इंदापुर येथे हायवेवर आले आहे. पुण्यातून सोलापूरकडे जाणारी वाहतूक लोणी काळभोर येथे थांबविली आहे. कोणीही सोलापूर दिशेने प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे.
* पंढरपूर – सातारा रस्ता बंद
सासुरे गावातील नऊ मानसं नागझरी नदीलगतच्या शेतात जनावरांच्या बेडवर जांभळाच्या झाडावर राञभर आडकवून पडले आहेत. शेडच्या खालून व बाजूने पाचे मीटर अंतराने वारीक ओढा आणि नागझरी नदीतील पाणी एकञ मिळाले आहे.
सासुरे गावातील 80 जनावरांना जलसमाधी मिळाल्याचा अंदाज आहे.
पंढरपूर सातारा रास्ता बंद केला आहे. कसाळ नदीला पूर आला आहे.
अक्कलकोट – पितापूर गावचा संपर्क तुटला; ३५ टक्के गाव पाण्यात गेली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
* वाहतूक ठप्प
पंढरपूर – सातारा
पंढरपूर – फलटण
पंढरपूर – अकलुज – इंदापुर
वाहतुक ठप्प
*उपरी व भंडीशेगाव येथील पुलावर पाणी