Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरात आठ हजारावर अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; प्रशासन सज्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपुरात आठ हजारावर अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; प्रशासन सज्ज

Surajya Digital
Last updated: 2020/10/15 at 10:31 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : परतीच्या पावसाने सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे, नीरा व भीमा नदी काठी पुरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील ८ हजार ४०० नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. पूरस्थित मदत व बचाव कार्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

भीमा नदीत संगम येथे उजनी धरणातून दुपारी ३ वाजता भीमा नदीपात्रात २ लाख ३२ हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाणी येत आहे. पुरस्थितीमुळे पंढरपूर तालुक्यातील नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  शहरातील अंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी परिसर, लखुबाई मंदीर परिसर येथील ३५४ कुटुंबातील १ हजार ६५७ नागरिकांना केंद्रे महाराज मठ, सारडा भवन, तनपुरे महाराज मठ, लोकमान्य शाळा, चैतन्य महाराज मठ, गंगागिरी मठ तसेच पर्यटक निवास येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या नागरिकांना विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समिती मार्फत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील नऊ मंडलातील नदी काठच्या गावांतील तसेच पुराचा फटका बसलेल्या १ हजार ६८७ कुटुंबातील ६ हजार ७४८ नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, समाज मंदिरे, मंदिरे आदी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पंढरपूर शहराला जोडणाऱ्या पुलावरती पाणी आल्याने पंढरपूर- पुणे, पंढरपूर-सातारा, पंढरपूर-मोहोळ आणि पंढरपूर विजापूर हे मार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आले आहेत. तर काही मार्गासाठी पर्यायी मार्गाने सोडण्यात आले असल्याचेही ढोले यांनी सांगितले आहे.

या ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत आवश्यक आरोग्य पथकासह औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पूरस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #पंढरपूर #प्रशासन #सज्ज #आठहजार #अधिकजणांना #सुरक्षितस्थळी #हलविले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताचे ‘ऑस्कर’ स्वप्न पूर्ण करणा-या भानू अथैय्यांचे निधन; कोल्हापुरातील कारकीर्द
Next Article मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा; आरोप – प्रत्यारोप सुरु

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?