Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा; आरोप – प्रत्यारोप सुरु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा; आरोप – प्रत्यारोप सुरु

Surajya Digital
Last updated: 2020/10/15 at 10:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. 2012 मध्ये यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात एका ट्रॅफिक पोलिसावर हात उगारला होता. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना जामीन मिळालेला आहे.

24 मार्च 2012 रोजी अमरावतीमधल्या अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलिसासोबत अॅड. यशोमती ठाकूर यांनी वाद घातला आणि मारण्याचा प्रयत्न केला. यशोमती ठाकूर तेव्हा आमदार होत्या. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर 2012मध्ये दाखल करण्यात आला होता.

आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा न्यायालयात हे आरोप सिद्ध झाले आणि न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना 3 महिने शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड सुनावला. ठाकूर यांच्यासोबतच त्यांचे कार चालक आणि दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवण्यात आलेलं आहे. तर फितूर होऊ साक्ष दिल्याबद्दल एका पोलिसालाही शिक्षा सुनावण्यात आलीय.

न्यायालयाने सुनावलेल्या या निर्णयाबद्दल बोलताना महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, ” न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. याक्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल.”

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“कर्तव्य करणाऱ्या एका पोलिसावर हात उचलण्याचा गंभीर गुन्हा यशोमती ठाकूर यांनी केला असल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही,” अशी मागणी भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.

याविषयी प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “बाकी राजीनामा देण्याच्या मागणीबाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे, आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.”

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #मंत्रीयशोमतीठाकूर #शिक्षा #आरोपप्रत्यारोप #भाजप #राजीनामा #मागणी #जामीन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरात आठ हजारावर अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले; प्रशासन सज्ज
Next Article पुण्यातील पर्जन्य नुकसानीला भाजप जबाबदार : खासदार सुप्रिया सुळे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?