नवी दिल्ली : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. तशी याचिका सर्वोच्च न्यायालयात देण्यासाठी आली होती. ती याचिका आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला चांगलेच फटकारले. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असे विचारत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिका कर्त्यांना सुनावले आहे. दिल्लीतील ३ जणांनी ही याचिका दाखल केली होती. केवळ मुंबईत घडणाऱ्या घटनांवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाहीत, असे स्पष्ट शब्दांत मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे, हा आपल्या अधिकार कक्षेत नसल्याचे न्या. बोबडे यांनी स्पष्ट केले. तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे? केवळ मुंबईच्या घटनांवरून राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, असेही चीफ जस्टिस बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. दिल्लीतील तीन रहिवाशांनी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महा विकास आघाडी सरकारला बरखास्त करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली.
रिषभ जैन, गौतम शर्मा आणि समाजसेवक विक्रम गहलोत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारला बरखास्त करावे, अशी मागणी केली होती. ‘तुम्ही राष्ट्रपतींना विचारा,’ असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना सांगितले आहे. ‘महाराष्ट्र किती मोठा आहे हे आपणास ठाऊक आहे,’ अशी याचिका फेटाळून लावताना मुख्य न्यायाधीशांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, अशी विचारणाही सरन्यायाधीशांनी केली. दरम्यान राष्ट्रपतींकडे ही मागणी करण्याचे स्वातंत्र्य असल्याची कोपरखळीही सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला या निमित्ताने लगावली. याचिकाकर्त्यांने केवळ मुंबईमधील घटनांचा उल्लेख करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी केली होती. त्यावर ‘महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? केवळ मुंबईतील घटनांवरून सर्व महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन कसे लावता येईल, असा सवाल करत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे.
* काय म्हणाले न्या. शरद बोबडे
– केवळ मुंबईच्या घटनांवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही : सुप्रीम कोर्ट
– राष्ट्रपती राजवट लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींचा आहे.
– तुम्हाला माहित तरी आहे का, महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे?
– चीफ जस्टिस बोबडे यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले
