मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
बुधवारी उद्धव ठाकरे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…
* असा असेल दौरा
– सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीनेने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण
– सकाळी १०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
– सकाळी १०.१५ वा. काटगाव काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण
– सकाळी ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी.
– सकाळी ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
– दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव.
– दुपारी १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव.
– दुपारी १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.