Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: १०० पोलिस हेल्पलाईन क्रमांक होणार बंद; ११२ हा नंबर सेव्ह करुन ठेवा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

१०० पोलिस हेल्पलाईन क्रमांक होणार बंद; ११२ हा नंबर सेव्ह करुन ठेवा

Surajya Digital
Last updated: 2020/10/20 at 10:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : एखाद्या आपत्कालीन प्रसंगी पोलिसांना संपर्क करायचा झाल्यास १०० हा नंबर चटकन नजरेसमोर येतो. अनेक वर्षांपासूनहा नंबर पीडितांच्या सेवेत आहे. देशभरातील २० राज्यांमध्ये १०० नंबर पोलिसांशी संपर्कासाठी वापरण्यात येतो. त्यात महाराष्ट्र व गुजरात या राज्यांचा देखील समावेश होतो. पण लवकरच ‘१००’ हा क्रमांक कायमचा इतिहासजमा होणार आहे. त्याऐवजी ‘११२’ हा नवीन व एकच क्रमांक आपत्कालीन प्रसंगी पीडितांच्या सर्व प्रकारच्या मदतीला उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत राज्यात पोलीस १००, अग्निशामक दल १०१ व महिला हेल्पलाईनसाठी १०९० हे क्रमांक वापरण्यात येत होते. परंतु, लवकरच हे क्रमांक कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्याऐवजी ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून राज्यात अस्तित्वात येणार आहे. देशातील २० राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी ११२ हा हेल्पलाईन क्रमांक स्वीकारला असल्याची माहिती आहे. यामध्ये मागच्या वर्षी सर्वप्रथम उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांकाऐवजी ११२ नंबरचा वापर हेल्पलाईन म्हणून सुरु केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या क्रमांकांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यात ‘११२’ ह्या एकाच क्रमांकाची सर्व प्रकारची मदत मिळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. ‘११२’ या एकाच क्रमांकाद्वारे सर्व प्रकारची मदत संकटात सापडलेल्या व्यक्तीला मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.  या वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यामध्ये ११२ हा हेल्पलाईन क्रमांक म्हणून अस्तित्वात आणला जावा यादृष्टीने तयारी सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक व नोडल ऑफिसर सेंट्लाईज हेल्पलाईन सिस्टीमचे एस जगन्नाथ यांनी दिली आहे.

आपत्कालीन प्रसंगी जर कुणी ११२ क्रमांकावरून संपर्क साधल्यास तात्काळ आणि एकाच वेळी पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना संबंधित क्रमांकाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याबाबत लवकरच सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात अस्तित्वात असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून या यंत्रणेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशपातळीवर एकच मदत संपर्क क्रमांक असावा या चर्चेने जोर धरला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील त्याप्रकारच्या सूचना दिल्या होत्या. त्याचाच आधार घेऊन आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #संकटकालीनंबर #100बंदहोणार #112नवीन #सेव्हकरुनठेवा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने बजावली नोटीस, खटला दाखल का करु नये
Next Article दुष्काळ दौ-यात फडणवीसांनी चोरली राज ठाकरेंच्या स्टाइलची कॉपी; ‘लाव रे तो’ व्हिडीओचा केला प्रयोग

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?