नंदुरबार : मृत्यूचा सापळा झालेल्या नागपूर सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात आज बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक ट्रॅव्हल्स बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. अतिशय भीषण स्वरुपाच्या या अपघातात 35 जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ज्यावेळी ही बस जवळपास 40 फूट खोल दरीत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. सदर अपघाताविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बचावदलानं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. पण, अपघाताचं स्वरुप पाहता यात काहींना आपला जीव गमवावा लागला. तर, गंभीर जखमींचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.
जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. या बसमधील बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्ह्यातील आहेत. तर, ही अपघातग्रस्त बस गुजरात पासिंगती असल्याचं कळत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स गाडी दरीत कोसळली. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाबाई घाटात हा भीषण अपघात घडला आहे. जळगावहून सुरतकडे जाणारी ही ट्रॅव्हल्स कोंडाबाई घाटातल्या दर्ग्याजवळ पुलावरून थेट 30 ते 40 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि मदत कार्य घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना तातडीने दरीतून बाहेर काढत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर नेमका अपघात कसा झाला याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ट्रॅव्हल्सही प्रवाशांनी भरली होती. तब्बल 35 ते 40 जण हे गाडीमध्ये असल्याचं सांगण्यात आहे. त्यानुसार पोलीस आता अधिक तपास करत आहेत.