Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एकनाथ खडसेंना उतारवय आले, फरक पडत नाही; सरकार असताना नऊ खाती होती खडसे यांच्याकडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ खडसेंना उतारवय आले, फरक पडत नाही; सरकार असताना नऊ खाती होती खडसे यांच्याकडे

Surajya Digital
Last updated: 2020/10/21 at 10:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. खडसे यांच्या टीकेनंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. आज बुधवारी सकाळी त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे आणि करगणी परिसरात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

ते म्हणाले, भाजपने एकनाथ खडसे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य काळच ठरवेल. पण पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षावर आरोप करणे योग्य नाही, ‘खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण आहे. त्यामुळे खच्चीकरण केले की पक्षाने मोठे केले. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही.

भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही. भाजपचे सरकार असताना नऊ खाती खडसे यांच्याकडे होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पाहणी दौरे रेड कार्पेटवरून होत आहेत. या दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावे. मात्र, शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #प्रवीणदरेकर #एकनाथखडसे #वय #फरकपडतनाही #भाजपकाळात #नऊखाती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाथाभाऊंच्या ‘रामराम’ ला चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Next Article नाशिकमध्ये माजी नगराध्यक्षाची हत्या; दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?