Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी; वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या वेगाने हालचाली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

कोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी; वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या वेगाने हालचाली

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 8:40 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत आहे. आता ही मागणी सत्यात उतरण्याचे संकेत मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चाचपणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख दिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमित देशमुख यांनी हे निर्देश दिले.

कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे खासदार राऊत म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,  वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक असलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा, असेही  देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, उच्च आणि तंत्र शिक्षण  उदय सामंत म्हणाले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. त्यापैकी रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबतचे काम सुरु आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे, असे निर्देशही सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

You Might Also Like

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष

भिंगारमध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज दिंडीचे राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीभावाने स्वागत

केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

TAGGED: #कोकणवासियासाठी #महत्त्वाची #बातमी #वैद्यकीय #महाविद्यालय #हालचाली #वेग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणुकीचे पडघम; काँग्रेस भवन परिसरात लावलेल्या कारमध्ये आढळली आठ लाखाची रोकड
Next Article शेतक-यांना मदत कधी ? मदतीसाठी आणखी किती वाट पाहायची ? आजची बैठक रद्द

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?