कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि इनोव्हा कारची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. भर रस्त्यात हा अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे इथं हा भीषण अपघात झाला आहे. बस आणि भरधाव इनोव्हा कार एकमेकांसमोर धडकली. यामध्ये कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं सांगण्यात येत आहे. तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कारचा चुरा झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
भर रस्त्यामध्ये अपघात झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर स्थानिकांनीही परिसरात मोठी गर्दी केली आहे. तर अपघाती वाहनं बाजूला करून आता इतर वाहनांना जागा देण्याते येत आहे.
अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी 3 जखमींना उपचारासाठी नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. तर कारमधून चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.