मुंबई : एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाथाभाऊंवर जो अन्याय झाला आहे, त्यावर बसून विषय निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात बघूया. दोन वाजताच प्रवेश ४ पर्यंत लांबला का? हे जयंत पाटलांनी सांगावं. कारण तुमच्याकडेही त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचे समाधान होईल, असे देऊ अशावर शेवटी नाथाभाऊ घरातून बळे-बळे बाहेर पडले. तुमचे समाधान होईल असे देऊ म्हणल्यानंतर त्यात लिम्लेटची गोळी आणि कॅडबरीवर देखील समाधान होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडत असून खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरुवातीला केला गेला.
पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपला असून खडसेंच्या मंत्रिपदावरून निर्माण झालेल्या चर्चांवर देखील जयंत पाटलांनी भाष्य केलं आहे. ‘खडसेंनी कोणत्याही पदासाठी पक्षात प्रवेश केला नसून त्यांनी पक्षात येताना काहीही मागितलेला नाही आणि आमच्यातही अजून तशी चर्चा झालेलं नसल्याचं सांगून अशा चर्चांना खतपाणी घालू नका,’ असं आवाहन देखील केलं आहे.
त्यामुळे आता ते लिम्लेटची गोळी देतात की कॅडबरी देतात आणि त्यावर नाथाभाऊ मनापासून खुश होतात किंवा आता काही पर्यायच नाहीये म्हणून जे देतात यावर समाधानी आहे म्हणतात हे काळ ठरवेल’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.