Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आता पाण्याचा अपव्यय कराल तर भरावा लागेल मोठा दंड, भोगावा लागेल कारावासही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

आता पाण्याचा अपव्यय कराल तर भरावा लागेल मोठा दंड, भोगावा लागेल कारावासही

Surajya Digital
Last updated: 2020/10/24 at 11:49 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशात जर पाण्याचा अपव्यय  होत असेल तर त्याबाबत या पुढील काळात सावध राहण्याची आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे कोणतीही व्यक्ती आणि सरकारी संस्था जर भूजल स्त्रोतातून प्राप्त होणाऱ्या पिण्यायोग्य पाण्याचा अपव्यय करत असेल किंवा गरज नसताना वापर करत असेल, तर तो दंडात्मक गुन्हा मानला जाईल.

केंद्र सरकारने नवे निर्देश दिले असून त्या नुसार, पिण्यायोग्य पाण्याचा दुरुपयोग केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे.यापूर्वी भारतात पाण्याच्या अपव्ययासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नव्हती. घरांमधील टाक्यांव्यतिरिक्त अनेकदा टँकद्वारे ठिकठिकाणी पाणी पोहोचविणाऱ्या संस्था देखील पाण्याचा अपव्यय करतात.

केंद्रीय भूजल प्राधिकरणाने (सीजीडब्ल्यूए) पाण्याची नासाडी आणि गरज नसताना वापर करण्यावर बंदी आणण्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० ला पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ च्या कलम ३ च्या तरतुदींचा उपयोग करत प्राधिकरण आणि देशातील सर्वलोकांना उद्देशून हा आदेश काढला आहे. तो आदेश म्हणतो- देशात कोणतीही व्यक्ती भू-जल स्त्रोताद्वारे प्राप्त होणाऱ्या पिण्यायोग्य पाण्याचा अपव्यय करू शकत नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘हा आदेश जारी होण्याच्या तारखेपासून राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये पाणी पुरवठ्याची यंत्रणा चालवणाऱ्या जलबोर्ड, जल निगम, वॉटर वर्क्स डिपार्टमेंट, पालिका, नगरपालिका, विकास प्राधिकरण,पंचायत किंवा इतर पाणी पुरवठा करणारी कोणतीही यंत्रणा पिण्यायोग्य पाण्याचा उपव्यय होणार नाही किंवा गरज नसताना पाण्याचा वापर होणार नाही, याची काळजी घेतील. या आदेशाचे पालन व्हावे यासाठी या सर्व संस्था एक व्यवस्था निर्माण करतील आणि आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करतील.’

देशात कोणतीही व्यक्ती भू-जल स्त्रोताद्वारे प्राप्त होणाऱ्या पिण्यायोग्य पाण्याचा अपव्यय करू शकत नाही.

राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) राजेंद्र त्यागी आणि स्वयंसेवी संस्था फ्रेंड्सद्वारे गेल्या वर्षी २४ जुलै, २०१९ या दिवशी पाण्याचा अपव्यय रोखण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेवर पहिल्यांदा सुनावणी घेतली होती. या प्रकरणी एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर १५ ऑक्टोबर २०२० च्या लवादाच्या आदेशाचे पालन करत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अधीन केंद्रीय भूजल प्राधिकरणाने(सीजीडब्ल्यूए) आदेश जारी केला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #पाण्याचा #अपव्यय #दंड #शिक्षा #कारावास
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यूपीएससी २०२० चा निकाल जाहीर; उत्तीर्ण झालेले मुख्य परीक्षेसाठी पात्र
Next Article माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना कोरोना

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?