नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे प्राप्तीकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची मुदत या कॅलेंडर वर्षाअखेरपर्यंत पुन्हा वाढविण्याची घोषणा करण्यात आली. यानुसार आता प्राप्तीकर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2020 आहे.
कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बसलेला फटका व कोट्यवधी लोकांचे रोजगार हिसकावून घेतल्याच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) हा दिलासा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2019-20 या आर्थिक वर्षासाठीचे विवरणपत्र भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत आणकी मुदतवाढ दिल्याचे ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आले. ज्या करदात्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक असते त्यांच्यासाठी आयटीआर भरण्याची नवीन मुदत त्यापुढचा महिनाभर म्हणजे 31 जानेवारी 2021 ही करण्यात आली आहे.
आयकर विभागाने म्हटलं आहे की, कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत 2019 -20 या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयटीआर भरण्यासाठीच्या कालावधीत मुदतवाढ केली आहे.