Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘आदर्श भाडे’ कायद्यामुळे भाडेकरु येणार संकटात; नव्या भाडे कायद्यातील अडचणीच्या तरतुदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थमहाराष्ट्र

‘आदर्श भाडे’ कायद्यामुळे भाडेकरु येणार संकटात; नव्या भाडे कायद्यातील अडचणीच्या तरतुदी

Surajya Digital
Last updated: 2020/10/26 at 9:04 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : केंद्र सरकारने आदर्श भाडे कायद्याचा मसुदा जारी केला असून हा कायदा लागू झाला तर दक्षिण मुंबईतील जुन्या इमारतीत राहणाऱ्या सुमारे २५ लाख भाडेकरु संकटात येणार आहेत. राज्यातील सर्वच घरभाडेकरु संकटात येऊ शकतो.

नव्या भाडे कायद्यातील तरतुदीनुसार कितीही भाडे ठरविण्याची मुभा घरमालकाला मिळाल्यामुळे  एक तर भाडेकरूंना भरमसाठ भाडे भरणे बंधनकारक होईल किंवा परवडत नाही म्हणून घर रिक्त करणे असेच पर्याय शिल्लक राहणार आहेत. महाराष्ट्राकडून या कायद्याबाबत काय भूमिका घेतली जाते, यावर या भाडेकरूंचे भवितव्य अवलंबून आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

२००२ नंतर अगोदरच कायद्यात सुधारणा करून केलेल्या बदलामुळे भाडेकरू अडचणीत आला आहे. त्यात हा कायदा लागू झाला तर हा भाडेकरू रस्त्यावरच येईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने हा कायदा लागू करणार नये, अशी मागणी भाडेकरुंमधून होत आहे.

या कायद्याचा मसुदा केंद्र सरकारने राज्यांना पाठविला आहे. या कायद्यानुसार किती भाडे आकारायचे वा भाड्यामध्ये वाढ करण्याचा अधिकार घरमालकाला मिळणार आहे. पागडी पद्धतीद्वारे एकरकमी रक्कम दिली असली तरी भाडेकरूंचे संरक्षण या नव्या कायद्यामुळे रद्द होणार आहे. या काळात दुरुस्तीसाठी भाडेकरूंनी भरलेल्या रकमेचाही विचार करण्यात आलेला नाही.

* नव्या कायद्यातील अडचणीच्या तरतुदी :

कलम १५ – घरमालकाने राहण्यायोग्य नसलेले घर दुरुस्त न केल्यास भाडेकरू ते रिक्त करू शकतो. हे वरकरणी भाडेकरूंच्या हिताचे वाटत असले तरी घरमालक दुरुस्तीस टाळाटाळ करून घर रिक्त करून घेऊ शकतो. वास्तविक घर दुरुस्त करण्याची सक्ती घरमालकावर असायला हवी. पण ते या कायद्यात नाही.

कलम २१ (ई) –  जेव्हा मालकाला इमारत दुरुस्त वा विकसित करावयाची असेल तर तो भाडेकरूला घराबाहेर काढू शकतो आणि त्या बदल्यात त्याला नवे घरही मिळू शकत नाही. भाडे कायदा व म्हाडा कायद्यातील तरतुदीशी हे विसंगत आहे.

कलम २१ (ग) –  मालकाला घर विकायचे असेल तरीही तो भाडेकरूला घराबाहेर काढू शकतो. त्यानंतरही भाडेकरूने नकार देत त्याच घरात वास्तव्य केले तर दंडाच्या स्वरूपात भरमसाठ भाडे आकारता येणार आहे.

You Might Also Like

अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, आमदार चंद्रकांत पाटील पोलिसांकडून ताब्यात; मुक्ताईनगर बंद

अजित पवारांना वाढदिवसाच्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडून शुभेच्छा

राजीनाम्याचा प्रश्नच नाही; बदनामी करणाऱ्यांवर कोर्टात कारवाई – मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार

TAGGED: #25लाखभाडेकरु #संकटात #नव्याभाडे #कायद्यातील #तरतुदीनुसार #आदर्शभाडेकायदा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री पदाचा मास्क उतरवून उद्धव ठाकरेंनी कंगना, राणे, राज्यपाल, दानवे, पंतप्रधानांवर केले भाष्य
Next Article ‘या’ 5 कोटी व्हॉट्सऍपधारकांना वापर करण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे

Latest News

अखेर ३८ दिवसांनंतर ब्रिटिश लढाऊ विमान एफ-35बीने केरळहून भरलं उड्डाण
महाराष्ट्र July 22, 2025
योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, आमदार चंद्रकांत पाटील पोलिसांकडून ताब्यात; मुक्ताईनगर बंद
महाराष्ट्र July 22, 2025
अजित पवारांना वाढदिवसाच्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडून शुभेच्छा
महाराष्ट्र July 22, 2025
राजीनाम्याचा प्रश्नच नाही; बदनामी करणाऱ्यांवर कोर्टात कारवाई – मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा
महाराष्ट्र July 22, 2025
आमचा अणुकार्यक्रम थांबणार नाही – इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरघची यांचा इशारा
देश - विदेश July 22, 2025
सीबीएसईचा मोठा निर्णय: शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आता अनिवार्य
देश - विदेश July 22, 2025
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्स प्रकरणात राणा दग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू यांना ईडीकडून समन्स
देश - विदेश July 22, 2025
हरियाणात 3.2 तीव्रतेचा सौम्य भूकंप; कोणतीही हानी नाही
देश - विदेश July 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?