मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष आता राजकारणात एन्ट्री करत आहे. अभिनेत्री पायल घोष आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. अभिनेत्री पायल घोष आरपीआयचा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
पायल घोषकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनुराग कश्यप यांच्यावर आरोप लावल्यानंतर पायल घोषला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पायल आरपीआय पक्षात प्रवेश करणार आहे. पायलसोबत तिचे वकील देखील आरपीआय प्रवेश करणार आहेत. पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी समन्स बजावत कश्यप यांची 8 तास चौकशीदेखील केली होती. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तर कश्यप यांना एक्स वाईफनं पाठिंबा दिला होता.