Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नारायण राणेंच्या टीकेला शिवसेना नेत्यांचे उत्तर; राणेंची एनसीबीकडून चौकशी झाली पाहिजे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नारायण राणेंच्या टीकेला शिवसेना नेत्यांचे उत्तर; राणेंची एनसीबीकडून चौकशी झाली पाहिजे

Surajya Digital
Last updated: 2020/10/26 at 11:06 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप खासदार नारायण राणे यांनी आज सडकून टीका केली आहे. नारायण राणेंच्या टीकेला आता शिवसेना नेत्यांना उत्तर दिलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी असा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नसल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचा इतिहास भुगोल सर्वांना माहिती आहे. नारायण राणेंचे पत्रकार परिषदेतील हावभाव, बोलणं बघता त्यांची मेडिकल तपासणी करावी, असा टोला दादा भुसे यांनी लगावला. राणेंचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये अंतर जरी असलं तरी नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून शिकले पाहिजे. संयम कसा बाळगायचा हे आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करायला नाही पाहिजे. महाराष्ट्राला एक राजकीय इतिहास आहे. मराठा आरक्षणाच्याबाबतीत सरकार गंभीर आहे. पण 15 आमदार निवडून येणार किंवा सरकार पडणार असं बोललं जात होतं. आजच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र ठरवेल उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं.

वाल्मिकीचा राणे पुन्हा वाल्या झाल्याची परखड टीका शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी राणेंवर केली. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांविषयी अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा राणे आहे. त्यामुळे ज्याच्या मनातच पाप आहे त्याच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा काय करणार. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी राणेंचा समाचार घेतला. त्याचबरोबर ज्या भाषेत ते बोलत होते, त्यामुळे दिल्लीतील एनसीबीच्या टीम मार्फत त्यांची चौकशी करावी, असा खोचक टोलाही खोतकरांनी लगावला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #शिवसेना #नेत्यांची #नारायणराणे #टीकेला #उत्तर #एनसीबीकडून #चौकशी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत वर्णद्वेषाचा भारतीय उद्योगपतीच्या मुलीला त्रास; कुटुंबास रेस्टारंटमधून दिले हाकलून
Next Article मानवाला मोठे यश, अखेर चंद्रावर पाणी सापडले, नासाचा दावा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?