न्यूयॉर्क : जगात दररोज लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर कोरोना बळींची संख्या 6 लाख 4 हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जगात अमेरिका, ब्राझील आणि भारताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८ लाख ३३ हजार २७१ जणांना कोरोना झाला आहे. यापैकी एक लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची परिस्थिती सर्वात भयानक आहे. अमेरिकासारख्या देशात कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकासानामुळे अनेक देशात भितीचं वातावरण आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
ब्राझीलमध्येही कोरोनाची भयावह परिस्थिती असून आतापर्यंत २० लाख ७५ हजार जणांना कोरोना झाला आहे. तर ७८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ भारताला कोरोनाचा विळाखा बसला आहे. भारतामध्ये आतापर्यंत जवळपास ११ लाख जणांना कोरोना झाला असून २७ हजार जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २० दिवसांत भारतात पाच लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात सध्या दरदिवशी ३० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.
* भारतातील कोरोना मृत्यूदर इतर देशाच्या तुलनेत कमी
– देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. दररोज कोरोनाची 35 हजारच्या जवळपास नवी प्रकरणे समोर येत आहेत. यादरम्यान दिलासादायक बातमी ही आहे की, देशात कोरोनाचा मृत्यूदर खुप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोनाचा मृत्यूदर 2.49 टक्के आहे. हा मृत्यूदर सतत कमी होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. तर, दुसरीकडे देशात कोरोनाची प्रकरणे वेगाने रिकव्हर होत आहेत. मागील 24 तासात देशात 23,672 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकुण 6.77 लाख लोक बरे झाले आहेत.