नवी दिल्ली : तुम्ही जर बँक खात्याचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बँकेच्या काही महत्त्वाच्या नियमात पुढील महिन्यापासून बदल होणार आहेत.
बँकेकडून आधीपासून एसएमएस सुविधा, मिनिमम बॅलन्स, एटीएम आणि चेकबुकचा वापर इ. सुविधांवर बँकेकडून शुल्क आकारले जाते. मात्र आता यामध्ये आणखी एक सुविधा समाविष्ट होत आहे. आता ग्राहकांना पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी देखील काही निश्चित शुल्क द्यावे लागणार आहे. याची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक याबाबत त्यांचा निर्णय लवकरच घेणार आहेत. 1 नोव्हेंबर 2020 पासून निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा हे व्यवहार केल्यावर ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे.
अशी माहिती मिळते आहे की, बँक ऑफ बडोदाने चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे तर बचत खात्यातून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे शुल्क निर्धिरित केले आहे. पुढील महिन्यापासून ग्राहक लोन खात्यासाठी महिन्यातून 3 वेळानंतर जेवढे वेळा पैसे काढतील, तेव्हा त्यांना 150 रुपये द्यावे लागतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बचत खात्याबाबत बोलायचे झाले तर, अशा खातेधारकांना तीन वेळा पैसे जमा करणे मोफत असेल. मात्र तर चौथ्या वेळी पैसे भरायचे असतील तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना देखील यामध्ये कोणतीही सवलत नाही आहे. जनधन खातेधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे पण पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील
बचत खातेधारकांसाठी तीन वेळा रक्कम जमा करणे नि:शुल्क असेल. चौथ्यांदा पैसे जमा करण्यासाठी 40 रुपये द्यावे लागतील. पैसे काढण्याबाबत बोलायचे झाले तर तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे. चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे.