अक्कलकोट : शेतकऱ्यांना गुलामगिरीत ठेवण्यासाठी शेतकरीविरोधी असा नवा कृषी कायदा थोडक्यात काळा कायदा केला आहे. हा कायदा रद्द होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही नसल्याचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी ठणकावून सांगितले.
अक्कलकोट येथील प्रमिला पार्क काँग्रेस कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी बैठक झाली. केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (२ नोव्हेंबर) दुपारी एक वाजता बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विविध मार्गाने या काळ्या विधेयकाविरूद्द काँग्रेसतर्फे देशभर आंदोलन छेडले आहे. २ नोव्हेंबरच्या मोर्चात शेतकऱ्यांनी बैलगाडी, ट्रक्टर घेऊन सामील व्हावे व मोर्चा यशस्वी करावे, असे आवाहन सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
मोर्चेस फत्तेसिंह क्रीडांगणापासून प्रारंभ होणार असून एवन चौक, बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे काँग्रेस भवन येथे समारोप होणार आहे. तहसीलदारांना निवेदनही देण्यात येणार आहे.