मुंबई / सोलापूर: समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबत चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळांनी राज्यपालांना निवेदन दिले. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी राज्यपाल यांना सांगितल्या. यावेळी मकरंद कुलकर्णी यांनी राज्यसरकारशी आजपर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली.
संजीवनी पांडे यांनी ब्राह्मण समाजातील महिलांची आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत अडचणी मांडल्या. ॲड. आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करण्याची मागणी केली. यावेळी राज्यपालांनी सर्व अडचणी ऐकून तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्वासन दिले.