Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोरणा नदीत आढळला मृत बिबट्या; क्रोनिक न्यूमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मोरणा नदीत आढळला मृत बिबट्या; क्रोनिक न्यूमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/07/20 at 5:28 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : मोरगिरी विभागातील माणगाव येथे मोरणा नदीत शनिवारी मृतावस्थेत बिबट्याचे शव आढळून आले. या बिबट्याचा मृत्यू क्रोनिक न्यूमोनियामुळे झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात सांगितल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

18 जुलै रोजी पाटण वनपरिक्षेत्रातील माणगाव येथे मोरणा नदीत वाहून आलेला बिबटया नदीकडेला जनावरे चारत असलेल्या मुलांनी पहिला. त्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर लगेच पाटणचे वनक्षेत्र अधिकारी विलास काळे, मल्हारपेठचे वनपाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या मदतीने मृत बिबट्यास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी पाटणच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क होऊ शकला नसल्याने मृत बिबट्यास तळबीड (ता. कराड) येथील पशुसंवर्धन दवाखान्यात नेण्यात आले.

तिथे डॉ. भूतकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन सहाय्यक वनरक्षक किरण कांबळे, माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यात उपस्थितीत केले. यावेळी बिबट्याचा मृत्यू क्रोनिक न्यूमोनियामुळे झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले. बिबट्याचे नखे, दात, कातडी हे सर्व सुव्यवस्थेत आहे. त्यानंतर वनविभागाच्या वराडे (ता. कराड) येथील रोपवाटिकेत मृत बिबट्याचे दहन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक वनरक्षक किरण कांबळे, माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, पाटणचे वनक्षेत्र अधिकारी विलास काळे, वनपाल ए. पी. जाधव, वनरक्षक रामदास घावटे, बंडू माने, रमेश जाधवर, वराडे, दीपाली अवघडे, वनमजूर सुरेश पवार आदी उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #मोरणानदी #मृतबिबट्या #सांगलीकराड #मोरगीरी #पाटण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेता प्रभास आणि दीपिका ही जोडी प्रथमच ऑनस्क्रीन दिसणार एकञ
Next Article सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सोनवणे यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?