पंढरपूर : पंढरपूर – कुर्डुवाडी महामार्गावरील रोपळे येथे ट्रक व ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. हा अपघात आज रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्रॅक्टर (एम एच १३ डीई ४९२४) पंढरपूरकडून धाराशिवकडे निघाला होता. तर मालट्रक (एम एच २७ बीएक्स १०८३) बीडहून पंढरपूरकडे येत असताना रोपळेजवळ समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये ट्रक चालक बंडु दौलतराव घाडगे (रा अंबाजोगाई जि बीड ) हे मयत झाले आहेत. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.
*अर्धवट रस्त्यामुळेच अपघात
सध्या या महामार्गावरील अनेक ठिकाणी ठेकेदाराने पुल व साईटपट्टयांची कामे अर्धवट ठेवली आहेत. यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. मागील रविवारी (२५ आक्टोबर) देखील आढीव विसावा या ठिकाणी खराब रस्त्यामुळे उसाने भरलेला ट्रक पलटी झाला होता. याकडे मात्र संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.