सोलापूर : विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलाव येथे एका विवाहित महिलेने नैराश्यातून आपल्या दोन लहान चिमुरड्या लेकरांसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तलावात उडी मारली होती. तेव्हा प्रसंगावधान राखून त्या तिघांचा जीव वाचवल्याबद्दल दिनेश अरुण जाधव या युवकाचा संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने आज पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
आज दुपारी तीनच्या सुमारास एक महिला आपल्या दोन लहान मुलासह एका रिक्षातून येऊन धडक छत्रपती संभाजी महाराज तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी मारली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेव्हा येथून आपला कामानिमित्त जाण्यासाठी निघालेले दिनेश अरुण जाधव यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ त्या बुडत असलेल्या दोन्ही लहान मुलांना व त्या महिलेस बाहेर काढले व त्या तीन जिवांच्या जीव वाचवला.
सदर बझार पोलिस स्टेशनचे व विजापूर नाका पोलिस स्टेशनचे बीट मार्शल हजर झाले. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सदर बझार पोलिस स्टेशनला येऊन गेले आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धाडसाबद्दल दिनेश अरुण जाधव यांचा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, राष्ट्रवादीचे मुसा अख्तर व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.