Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: … तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजेंचा इशारा, शरद पवारांनीही लक्ष घालावे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

… तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; शिवेंद्रराजेंचा इशारा, शरद पवारांनीही लक्ष घालावे

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 5:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं, असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

आज साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे. या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण उपसमिती रद्द करण्याची मागणी केली आहे. या उपसमितीचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करा आणि नव्या सदस्यांची नेमणूक करा अशी मागणीही आबा पाटील यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेण्यात हे सरकार चुकलं आहे अशीही टीका त्यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

* शरद पवारांनीही लक्ष घालावे

इतिहासात मराठ्यांचं पानिपत झालं असं नेहमी बोललं जातं.. आता आपण एकत्र आलो नाही तर दुसरं सामाजिक पानिपत होईल आणि इतिहास पुन्हा तुम्हाला माफ करणार नाही, असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. तसंच आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनीही लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #मराठ्यांचे #सामाजिकपानिपत #सातारा #गोलमेजपरिषद #शिवेंद्रराजे #मराठाआरक्षण #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिवाळीआधी वीज ग्राहकांना दिलासा मिळेल; ऊर्जामंत्र्यांचे संकेत
Next Article उमराणीचे महादेव बहिरगोंडे सावकार यांच्यावर गोळीबार; अंगरक्षक ठार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?