Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देवेंद्र फडणवीसांचा द्वेष कमी करा; एकनाथ खडसेंना भाजपाने ओबीसी नेत्यावरुन सुनावले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

देवेंद्र फडणवीसांचा द्वेष कमी करा; एकनाथ खडसेंना भाजपाने ओबीसी नेत्यावरुन सुनावले

Surajya Digital
Last updated: 2020/11/02 at 10:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे
यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांच्या टीकेची धार आणखी वाढलेली आहे. त्याचबरोबर ओबीसीचा मुद्दाही त्यांनी लावून धरला आहे. यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं, सातत्याने ते फडणवीसांना टार्गेट करत आहेत, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत, असंही त्यांनी सूनावलं.

दरेकर म्हणाले, ओबीसीसाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना जेवढं काम केलं तेवढं कुणीही केलं नाही. अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम फडणवीस सरकारने केलं होतं. आमचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातूनच येतात. याचा उल्लेख आम्ही करत नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र भापला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला हा उल्लेख करावा लागतो असंही ते म्हणाले. दरेकरांच्या या टीकेनंतर भाजप आता खडसेंविरुद्ध आक्रमक होणार असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये भाजपला पहिला हादरा दिला आहे.  जिल्ह्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

* राष्ट्रवादीत इन्कमिंग सुरु

खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश करून काही दिवस होत नाही तेच जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते गळाला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #प्रवीणदरेकर #एकनाथखडसे #ओबीसीनेता #सुनावले #इन्कमिंगसुरु
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संगीत विश्वातील तारा निखळला; पंडित दिनकर पणशीकर यांचे निधन
Next Article काबूल विद्यापीठात गोळीबार, 19 ठार तर 22 जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?