जेजुरी : जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. खंडेरायाच्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते. पण कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.
माञ, देवाच्या पुजेत कोणताही खंड पडू न देता मंदिराचे पुजारी,सेवेकरी आणि विश्वस्त यांनी खंडेरायाचे पूजा विधी केले. आज सकाळी त्रिकालपूजा आणि महापूजा झाल्यानंतर या मोजक्या लोकांनीच गडावर भंडाऱ्याची उधळण करत परंपरेच पालन केले आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी येथील सोमवती यात्रा उत्सव जरी रद्द करण्यात आला आहे. परंपरेनुसार कऱ्हा स्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे. मात्र नित्य सेवेकरी, पुजारी, मानकरी यांच्या हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी आणि कर्हेच्या पाण्याने उत्सव मूर्तींना निवडक लोकांच्या उपस्थितीत स्नान सोहळा पार पडला. जेजुरी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.
लाखो भाविक या जेजुरीत नेहमीच येत असतात. उधळला जाणारा भंडारा, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडाऱ्याच्या उधळणीने आसमंतालाला आलेले पिवळेपणा हे जेजुरीचे नेहमीचे दृश्य असतात. पण यावेळी कोरोनामुळे सर्व सोहळे रद्द करण्यात आले आहे. खंडेरायाच्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते. पण कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरीतही आजची सोमवती यात्रा पारंपरिक पद्धतीने पार पडली. सोमवती यात्रा असल्याने राज्यभरातून लाखो भाविक आले असते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेजुरीत सोमवती यात्रा असूनही प्रशासनाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघणाऱ्या पालखी सोहळ्याला परवानगी नाकारली आहे.
यामुळे मुख्य मानकरी पेशव्यांच्या उपस्थितीत मार्तंड देवसंस्थान, देवाचे पुजारी सेवक, खांदेकरी मानकरी व ग्रामस्थांनी सोमवती अमावस्येचे धार्मिक विधी मंदिरातच मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही गर्दी होण्याची शक्यता असल्याने पहाटेच यात्रेचे धार्मिक विधी मोजक्याच पुजारी मानकरी, सेवकांच्या उपस्थितीत कर्हा नदीचे पाणी गडावर आणून उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले, महापूजा,अभिषेक, धार्मिक विधी उरकण्यात आले. मुख्य गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. रोजमारा वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली.