नवी दिल्ली : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेने आज मंगळवारी दिल्लीमध्ये विशेष पूजा केली. अमेरिकेतील मतदान अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.
ट्रम्प यांच्या विजयासाठी हिंदू सेनेने पूर्व दिल्लीतील मंदीरात केलेल्या पूजेला हिंदू सेनेचे कार्यकर्ते व ट्रम्प समर्थक उपस्थित होते. विशेष पूजेसोबत यावेळी हवनही करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इस्लामिक कट्टरतावादाचा डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी विरोध केला आहे. कट्टरतावाद नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगाने ट्रम्प यांचे समर्थन करणे आवश्यक असल्याचे पूजा घालणारे पंडित वेदशास्त्री यांनी सांगितले.