Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला टी-20 चॅलेंज आजपासून सुरु; सुपरनोवाजचा असा आहे संघ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

महिला टी-20 चॅलेंज आजपासून सुरु; सुपरनोवाजचा असा आहे संघ

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 9:02 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

शारजाह : भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह इंग्लंड, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या तिसऱ्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला आज बुधवारपासून शारजाह येथे सुरुवात होत आहे.

तिन्ही संघ चार सामन्यात एकमेकांविरुद्ध स्वत:चे कौशल्य आणि दमखम पणाला लावणार आहेत. मागच्या दोन स्पर्धेचा विजेता सुपरनोवाज, मागच्यावर्षीचा उपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स हे संघ जेतेपदासाठी चढाओढ करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ९ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेत श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंडचेदेखील खेळाडू विविध संंघांतून खेळताना दिसतील. यंदा सर्वच सामने शारजाह येथे होणार असून सायंकाळी ७.३० वाजेपासून सामन्यांना सुरुवात होईल. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील सुपरनोवाजने मागच्या दोन्ही स्पर्धेत जेतेपदासह सर्वच सामने  जिंकले आहेत. या संघाला सलामीला  मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील व्हेलोसिटीविरुद्ध सामना खेळायचा असून जेतेपदाच्या हॅट्‌ट्रिकवर सुपरनोवाजचा डोळा असेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हरमनप्रीत मागच्या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये होती. तिने तीन सामन्यात दोन अर्धशतके ठोकली. अंतिम सामन्यात ३७ चेंडूत ठोकलेल्या ५१ धावा जेतेपदात निणार्यक ठरल्या होत्या. भारतीय टी-२० संघाची कर्णधार असलेली हरमन शानदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात हरमन चांगली कामिगरी करू शकली नव्हती.
जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या कामिगरीकडेदेखील अनेकांच्या नजरा असतील. मागच्या सत्रात मुंबईच्या या खेळाडूने सर्वाधिक १२३ धावा करीत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. मितालीदेखील पुढे येऊन नेतृत्व करण्यात तरबेज मानली जाते. मागच्यावर्षी अखेरच्या षटकात चार गडी गमावल्यामुळे तिचा संघ पराभूत झाला होता. तो हिशेब चुकता करण्याचा मितालीचा प्रयत्न असेल. व्हेलोसिटीची भिस्त १६ वर्षांच्या शेफाली वर्माच्या कामगिरीवरदेखील असेल. टी-२० विश्वचषकात शेफालीने सर्वाधिक ९ षटकार ठोकले होते.
कोरोनामुळे सर्वच आंतरराष्ट्रीय खेळाडू फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा मैदानावर दिसणार आहेत.

* सुपरनोवाजचा असा आहे संघ

सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उप कर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), शशिकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकिरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, अयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.

व्हेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टिरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिब्यादर्शनी, मनाली दक्षिणिनी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्हाईट, सुन लूस, जहाँआरा आलम आणि एम. अनघा.

ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ऋचा घोष, डी. हेमलता, नुज़हत परवीन (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादुर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चंथाम, डींड्रा डोटिन आणि काशवी गौतम.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #महिलाटी-20चॅलेंज #आजपासूनसुरु #सुपरनोवाजसंघ #शारजाह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आशा स्वयंसेविकांसाठी गुडन्यूज; दिवाळीअगोदर वाढीव मोबदला मिळणार
Next Article भारताची प्रियांका राधाकृष्णन न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात; शुक्रवारी शपथविधी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?