नवी दिल्ली : केरळच्या प्रियांका राधाकृष्णन ह्या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहे. पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी आपले नवीन कॅबिनेट स्थापन केले असून, त्यात प्रियंका राधाकृष्णन यांचा समावेश आहे. राधाकृष्णन (वय 41) यांनी समुदाय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला आणि त्यांचे पालन-पोषण सिंगापूरमध्ये झाले. त्यांचे आजोबा कोची येथे वैद्यकीय व्यावसायिक होते आणि कम्युनिस्ट देखील होते.
त्या शिक्षणासाठी न्यूझीलंडमध्ये आल्या होत्या आणि लेबर पार्टीच्या माध्यमातून 2004 पासून सक्रिय राजकारणात आहे.
त्या ऑकलंडमधून दोनदा खासदार राहिल्या आहेत. शेवटच्या ओणमच्या निमित्ताने त्या आर्डर्नबरोबर लाईव्ह आल्या आणि त्यांनी या सणाला अभिवादन केले, त्यानंतर केरळमधील प्रत्येक घरात त्या परिचित झाल्या. राधाकृष्णन यांना मल्याळम गाणी आवडतात आणि त्यांचा आवडता गायक केरळ येसूदास लोकप्रिय गायक आहे.
न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नियुक्ती नंतर त्याचे वडील आर. राधाकृष्णन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु ही क्वचितच आश्चर्याची बाब असल्याचे ते म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे.
त्यांचं पुढील शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर 2017 मध्ये निवडून आल्या.
“प्रियांका यांना मिळालेल्या मंत्रिपदामुळे तितकं आश्चर्य वाटलं नाही. त्यांना सरकारमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी आम्हाला अपेक्षा होती आणि पंतप्रधानांनी त्यांना तशी संधी देण्याचे संकेतही दिले,” असं आर राधाकृष्णन म्हणाले. आर. राधाकृष्णन हे सध्या चेन्नईत वास्तव्यास आहेत. “आम्ही त्यांच्या सरकारमधील भूमिकेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. न्यूझीलंड सरकारमधील त्या पहिल्या भारतीय मंत्री ठरल्या आहेत. राजकारणात संधी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या कुटुंबाला विसरू नये असा सल्ला आपण त्यांना दिला आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
* ६ नोव्हेंबरला शपथविधी
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांच्या लोकप्रियतेचे इंगित म्हणजे सामाजिक सहिष्णुतेवर त्यांनी दिलेला भर. देशातील सामाजिक वैविध्य जपणे हे त्यांचे धोरण ख्राइस्टचर्च हल्ल्यानंतर झळाळून जगभर दिसले. अशा आर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात, धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणारे सामाजिक वैविध्य, विकास व जनकल्याण खाते सांभाळण्यासाठी प्रियंका राधाकृष्णन यांची निवड झाली आहे. या खात्यांसह काहीसे जिकिरीचे, रोजगार खातंही त्यांच्याकडे असेल. प्रियांका केवळ भारतीय वंशाच्या नव्हेत तर त्यांना जन्म चेन्नईचा. आईवडील दोघेही भारतीयच. चेन्नईहून हे कुटुंब सिंगापूरला गेले आणि तिथे शालेय शिक्षण पूर्ण करून प्रियंका वेलिंग्टनमध्ये समाजकार्य पदवी अभ्यासक्रमासाठी न्यूझीलंडला आल्या, तेव्हापासून इथल्याच झाल्या. येत्या शुक्रवारी, ६ नोव्हेंबरला त्या शपथ घेतील.
* प्रियंका राधाकृष्णन यांची वाटचाल
आर्डर्न ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, त्या ‘लेबर पार्टी’शी प्रियंका राधाकृष्णन गेली सुमारे आठ वर्षे जोडल्या गेल्या आहेत. समाजकार्याचे शिक्षण घेत असतानाच त्या न्यूझीलंडमधील भारतीय व अन्य स्थलांतरितांच्या संपर्कात आल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेताना स्थलांतरित कामगार वा नोकरवर्गाच्या समस्या तसेच कौटुंबिक हिंसाचार यांवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रियंका यांनी ठरवले. ऑकलंड शहरात त्या पूर्णवेळ कामही करू लागल्या. मात्र समाजातील प्रश्न केवळ व्यक्तींमुळे निर्माण झालेले नसतात, तर धोरणांचे पाठबळ त्यांना नसते म्हणूनही वाढलेले असतात, तेव्हा धोरणे बदलण्यासाठी प्रसंगी संघर्ष केला पाहिजे, हे चेन्नईत कामगार चळवळीत असलेल्या आजोबांचे संस्कार आठवून प्रियांकाही त्या वेळी सत्ताधारी नसलेल्या लेबर पार्टीत सहभागी झाल्या. या पक्षात उमेदवार ठरवण्यासाठी ‘गुणवत्ता यादी’ तयार केली जाते. त्या यादीत 2014 मध्ये प्रियंका 23 व्या, तर त्यानंतरच्या निवडणुकीत (2017) बाराव्या आल्या होत्या! या त्रैवार्षिक निवडणुकांची उमेदवारी 2017 मध्ये त्यांना मिळाली. त्या हरल्या, पण त्यांना पक्षाच्या कोट्यातून खासदारकी देण्यात आली. यंदाच्या निवडणुकीतही अवघ्या 608 मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र न्यूझीलंडच्या पक्षनियुक्त खासदार पद्धतीमुळे त्यांना पुन्हा कायदेमंडळात स्थान मिळालं आणि मंत्रिपदाची कठीण परीक्षा देण्यास आता त्या सिद्ध झाल्या आहेत.